आरंभ मराठी / तामलवाडी
तरुण मुलाने दारू पिली म्हणून मुलाच्या बापाने चिडून मुलाच्या डोक्यात काठी घालून खून केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील दहिवडी या गावात घडली आहे. यासंबंधी बापाच्या विरोधात तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी बिभीषण शेषद्री चव्हाण (वय ५०, रा. दहिवडी ता. तुळजापूर) यांनी दिनांक ४ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता दहीवडी येथे त्यांचा मुलगा समाधान बिभीषण चव्हाण (वय २५ वर्षे, रा. दहिवडी) याला नमुद दारु पिऊन का आलास या कारणावरुन शिवीगाळ केली.
तसेच लाथाबुक्यांनी आणि काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. काठीचे घाव समाधान याच्या डोक्यात लागल्याने त्याला गंभीर इजा होऊन त्याचा मारहाणीत मृत्यू झाला.
करुन जिवे ठार मारले. यासंबधी विश्वास शेषाद्री चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 103 (1), 109 अन्वये बिभीषण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.