आरंभ मराठी / धाराशिव
शेअर मार्केटमधून नफा कमवून देतो म्हणत सांगली जिल्ह्यातील एका व्यक्तीने धाराशिव शहरातील दोघांची साडेसहा लाख रुपयांची आर्थिक फसवणून केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील एका आरोपीवर धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की, यातील
आरोपी राहुल किसन कुंभार (रा. आरवडे ता. तासगाव जि. सांगली) यांनी दिनांक 12 नोव्हेंबर 2023 ते 10 मे 2025 या काळात समता कॉलनी धाराशिव येथे फिर्यादी अक्षय माधव मुंढे (वय 29 वर्षे, रा.विकास नगर, धाराशिव) यांचा व त्यांच्या एका मित्राचा विश्वास संपादन करुन शेअर मार्केट मधून वीस टक्के नफा मिळवून देतो असे सांगून 6,40,000 रुपयांचा अपहार करुन आर्थिक फसवणुक केली आहे.
याप्रकरणी अक्षय मुंढे यांनी दिनांक 10 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथेभा.न्या.सं.कलम 316(2), 318(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे..