आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने जुगार विरोधी कारवाई करत दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या मागील आयोध्या नगर परिसरात धाड टाकली. या छाप्यात दहा जणांच्या टोळीला रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून २ लाख ३० हजार ३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींमध्ये सोहेल बाबा शेख (२५, उमर मोहल्ला), अमरुत विश्वनाथ शेरखाने (४१, काका नगर), रजत हजरत शेख (३०, शांतिनिकेतन), मेहफुज जिंदावली शेख (२१, खॉजा नगर), शेर मोहम्मद सलीम शेख (४१, गालिब नगर), शाकीर हमीद शेख (४९, सांजा रोड), माजिद हमीद शेख (४५, सांजा रोड), आवन विनायक वाघमारे (२८, बौद्धनगर), रिजवान खय्याम शेख (३९, खॉजा नगर), इरुान इस्माईल शेख (३२, खॉजा नगर) व इतर एक इसम यांचा समावेश आहे. या ठिकाणी पोलिसांना मटका जुगाराचे साहित्यासह कागदपत्रांचा संच, मोबाईल फोन, लॅपटॉप, प्रिंटर, कॅल्क्युलेटर व वाहने असा एकूण २,३०,०३० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.









