• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, April 12, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अखेर नवीन पीक विमा योजनेचा शासननिर्णय जाहीर ; शेतकऱ्यांना मदत मिळणे झाले आणखी कठीण

Aarambha Marathi by Aarambha Marathi
May 10, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.9k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

सरकारने केले कंपनीच्या फायद्याचे बदल

आरंभ मराठी / धाराशिव

एक रुपयात पीक विमा योजनेत झालेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने एक रुपयात पीक विमा योजना गुंडाळून नवी योजना जाहीर करण्याची घोषणा केली होती.

त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यानुसार शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी खरिप हंगामात २ टक्के, रब्बीसाठी १.५ टक्के योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी ५ टक्के योगदान द्यावे लागणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी (दि.९) प्रसिध्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६ पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात २०२३ च्या खरीप हंगामापासून १ रुपयात पीक विमा योजना सुरु करण्यात आली होती.

या योजनेची अंमलबजावणी होत असताना बीड, धाराशिव या जिल्ह्यात गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारकडून पीक विमा योजनेत बदल करण्यासंदर्भात विचार करण्यात येत होता. आता महाराष्ट्र सरकारनं शासन निर्णय जारी करत सुधारित पीक विमा योजनेतील बदल जाहीर केले आहेत.

शासन निर्णयात हे नमूद केले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षेतखाली २० मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या निर्देशांस अनुसरुन, राज्यात सद्यःस्थितीत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांकडून खरीपासाठी २%, रब्बीसाठी १.५% व नगदी पिकांना ५% असा शेतकरी हिस्सा घेतला जाईल.

तर, उर्वरीत पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येईल. पीक कापणी प्रयोगांवर आधारित, “सुधारित पीक विमा योजना” राबविण्याबाबतच्या प्रस्तावाला दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे.

पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ यांमुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट या बाबींचा विचार करुन सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता, केवळ जोखमीच्या बाबींचा समावेश करुन राबविण्यात येईल.

सुधारित पीक विमा योजना ही खरीप हंगाम २०२५ ते रब्बी हंगाम २०२५-२६ या हंगामांसाठी Cup & Cap Model (८०:११०) नुसार राबविण्यात येणार आहे. पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येऊन त्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या जारी केला जाणार आहे.

शासनाने या निर्णयात शेतकऱ्यांना किती हिस्सा भरावा लागणार हे स्पष्टपणे सांगितले नसले तरी अगोदरप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी ११०० रुपये प्रीमियम भरावा लागू शकतो. यामध्ये जिल्हानिहाय कुठली कंपनी असेल याचाही निर्णय जून महिन्यात घेण्यात येणार आहे.

एक रुपयात पीक विमा योजनेत धाराशिव जिल्ह्यातील तब्बल तीन हजार हेक्टर क्षेत्रावर बोगस पीक विमा भरल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. शासनाने नवीन पीक विमा राबविण्याचा निर्णय घेतला असला तरी हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक असल्याचे यातील तज्ञ सांगत आहेत.

अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास अग्रीम पीक विम्याची तरतूद नवीन योजनेत नसल्यामुळे नवीन योजनेत पीक विमा खरीप हंगाम संपल्यानंतर चार महिन्यांनी मदत मिळणार आहे त्यामुळे या योजनेला शेतकऱ्यांचा विरोध होण्याची शक्यता आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#pikvimayojana#farming
SendShareTweet
Previous Post

जिल्ह्यातील विकास कामांची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत घेतली बैठक

Next Post

तीन हजारांची लाच घेताना कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी जाळ्यात

Related Posts

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

April 11, 2026

आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश; अपर विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

April 10, 2026

काँग्रेसमध्ये संघटन मजबुतीकरणाचा बिगुल; जिल्हाध्यक्ष बदलाच्या चर्चेला वेग, तरुण चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता

April 10, 2026

‘या’ कारणामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना वर्षभर ब्रेक

April 10, 2026

मे महिन्यात तुळजाभवानी मंदिर विकास कामांचे होणार भूमिपूजन; पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

April 9, 2026
Next Post

तीन हजारांची लाच घेताना कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी जाळ्यात

तरुणीवर बलात्कार करून बिल्डिंगवरून ढकलून दिले; पीडित मुलीच्या पाठीचा मणका मोडला

ताज्या घडामोडी

सैन्य दलात २८ वर्षे सेवा; सुभेदार डोंगरे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक

April 11, 2026

मॉर्फ फोटोमुळे धाराशिवमध्ये राजकीय संभ्रम; पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा उधाण

April 11, 2026

आ. अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश; अपर विभागीय आयुक्त कार्यालयासाठी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

April 10, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group