आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक १ मधील ईव्हीएमद्वारे पहिल्या राऊंडची मतमोजणी पूर्ण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या उमेदवार परवीन खलिफा कुरेशी यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्या राऊंडमध्ये परवीन खलिफा कुरेशी यांना ३३१ मते मिळाली आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संगीता सोमनाथ गुरव यांना १२० मते मिळाली असून त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भाजपच्या नेहा राहुल काकडे यांना ११३ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या सुरेखा नामदेव वाघमारे यांना २३ मते, एमआयएमच्या मोमीन नाझिया युसुफ यांना १८ मते मिळाली आहेत.
राष्ट्रवादी पक्षाच्या मंजुषा विशाल साखरे यांना ७ मते मिळाली असून नोटाला ४ मते पडली आहेत. प्रभाग क्रमांक १ मधील पहिल्या राऊंडच्या निकालानंतर पुढील राऊंडकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









