आरंभ मराठी / भूम
व्याजाच्या पैशासाठी भूम तालुक्यातील सुकटा येथे तिघाजणांनी दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. यासंबधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी जोशी बबरु काळे, राधा जोशी काळे, तुषार जोशी काळे, (रा.सुकटा ता. भूम) यांनी दिनांक 11 ऑगस्ट रोजी साडेनऊ वाजता सुकटा येथे बालाजी जयराम भायगुडे (वय 36 वर्षे, रा. भवानवाडी, सुकटा) यांना घरात घुसून व्याजाने घेतलेले पैसे परत करण्याच्या कारणावरुन बालाजी भायगुडे यांना दगडाने मारहाण करुन जीवे ठार मारले.
बालाजी भायगुडे यांच्या पत्नी सोनाली बालाजी भायगुडे (वय 33 वर्षे) यांनी दिनांक 12 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे भुम येथे भा.न्या.सं.कलम 103(1), 333, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.