आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी सुरू असलेल्या मतमोजणीत पहिल्या दोन फेऱ्यांचे निकाल समोर आले आहेत.
पहिला राऊंड :
एकूण 5 टपाली मते मोजण्यात आली.
भाजपच्या नेहा काकडे यांना 2 मते,
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या परवीन खलिफा कुरेशी यांना 2 मते,
तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या संगीता गुरव यांना 1 मत मिळाले.
दुसरा राऊंड :
या फेरीतही एकूण 5 मते मोजण्यात आली.
भाजपच्या नेहा काकडे यांना 2 मते,
शिवसेना उबाठा गटाच्या संगीता गुरव यांना 3 मते मिळाली.
एकूण दोन राऊंडनंतरची स्थिती :
नेहा काकडे (भाजप) – 4 मते
संगीता गुरव (शिवसेना उबाठा) – 4 मते
परवीन खलिफा कुरेशी (राष्ट्रवादी शरद पवार गट) – 2 मते
पहिल्या दोन फेऱ्यांनंतर नगराध्यक्ष पदाची लढत अत्यंत चुरशीची बनली असून पुढील मतमोजणी फेऱ्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












