आरंभ मराठी / कळंब
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कळंब तालुक्यातील देवळाली येथील एका 26 वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. योगेश संजय लोमटे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, तो 26 वर्षांचा आहे. सोमवारी (दि.१७) सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.
योगेश लोमटे हा उच्चशिक्षित असून, गेल्या काही वर्षांपासून तो नोकरीसाठी प्रयत्न करत होता. मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळेच आपल्याला नोकरी लागत नाही या विचाराने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, सध्या पंचनामा सुरू आहे. घरातल्या तरुण मुलाने जीवन संपवल्यामुळे लोमटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस किचकट बनत असून, या प्रश्नावरून अनेक तरुणांनी जीव गमावले आहेत.