• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, January 24, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

लाडक्या भावांचा वनवास ; चार महिन्यांपासून वेतन नाही

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 21, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
73
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

युवा प्रशिक्षणार्थ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष ; शासकीय आस्थापनांची असहकार्याची भूमिका

आधार व्हेरिफिकेशन आणि प्रेझेंटी रिपोर्टमुळे मानधन मिळण्यास उशीर

आरंभ मराठी / धाराशिव

अत्यंत गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली ‘लाडका भाऊ’ योजना अर्थात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेतील युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील चार महिन्यांपासून लाडक्या भावांना शासनाने वेतनच दिले नसल्यामुळे लाडक्या भावांचा वनवास सुरू असल्याचे चित्र आहे.

फेब्रुवारी महिन्यात सहा महिन्यांची मुदत संपलेल्या युवकांना शासनाने पाच महिने मुदतवाढ देऊन योजनेचा कालावधी अकरा महिन्यांचा करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्याप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हे प्रशिक्षणार्थी युवक कामावर रुजू झाले. परंतु, बदललेली वेबसाईट, शासकीय आस्थापनांनी हजेरी पत्रक वेळेत न देणे तसेच आधार व्हेरिफिकेशनची टाकलेली अट यांमुळे फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांच्या कालावधीतील वेतन थकीत राहिले आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी देखील या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्यामुळे लाडक्या भावांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे

विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महायुती सरकारने युवकांची मते आपल्याकडे खेचण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना सुरू केली. शासकीय कार्यालयात सहा महिने कामाचा अनुभव मिळेल म्हणून तरुण-तरुणींनी या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल पाच हजार युवक या योजनेतून कामाला लागले. तुटपुंजा पगार असला तरी बेरोजगार युवकांना हाताला काम मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला होता.

परंतु, विधानसभा निवडणूक पार पडताच शासनाने शासकीय कार्यालयातील प्रशिक्षण बंद करण्याचा निर्णय घेतला. प्रशिक्षणार्थ्यांची फक्त खासगी संस्थांमध्ये यापुढे नियुक्ती केली जाणार आहे. त्यातच गेल्या चार महिन्यांपासून हे लाडके भाऊ वेतनापासून वंचित आहेत. यापुढे काम करावे की थांबावे, अशा संभ्रमावस्थेत प्रशिक्षणार्थी युवक आहेत.

फेब्रुवारीमध्ये पुन्हा वाढीव पाच महिन्यांसाठी जे उमेदवार रुजू झाले त्यांचे हजेरी पत्रक संबंधित कार्यालयाकडून कौशल्य विकास विभागास दिले जात नाही अशी तक्रार प्रशिक्षणार्थी करत आहेत. तसेच प्रशिक्षणार्थी उमेदवारांची वेबसाईटवर अगोदरच नोंदणी आणि डॉक्युमेंट अपलोड केलेले असतानाही पुन्हा एकदा आधार व्हेरिफिकेशन आणि डॉक्युमेंट अपलोड करायला सांगितले जात आहे.

या सर्व तांत्रिक अडचणीमुळे मागील चार महिन्यांपासून प्रशिक्षणार्थी उमेदवार पगारापासून वंचित आहेत. धाराशिव जिल्ह्यात या योजनेतून ४९८२ तरुण-तरुणी काम करत आहेत. यातील मोजक्या उमेदवारांना पगार मिळाला असला तरी बहुतांश उमेदवार चार महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी संख्या –

जिल्ह्यातील एकूण प्रशिक्षणार्थी -४९८२

खाजगी आस्थापना -१५७

खाजगी आस्थापनेत काम करणारे प्रशिक्षणार्थी -१२२१

सरकारी आस्थापना -२०८

सरकारी आस्थापनेत काम करणारे प्रशिक्षणार्थी -३७६१

. मुदत वाढवली : पाच महिने

पदवीधरासाठी मानधन : दहा हजार रुपये

बारावी उत्तीर्ण युवकांना : सहा हजार रुपये

आयटीआय, पदविका : आठ हजार रुपये

जिल्ह्याला महिन्याला लागतात ५ कोटी रुपये

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेत धाराशिव जिल्ह्यातील ४९८२ तरुण तरुणी प्रशिक्षण घेतात. यांना मानधन म्हणून महिन्याला साधारण पाच कोटी रुपये द्यावे लागतात. ही योजना आता अकरा महिन्यांची झाल्यामुळे वर्षाला ५० कोटींपेक्षा अधिकचा निधी फक्त धाराशिव जिल्ह्यासाठी लागणार आहे.

पेमेंटसाठी आधार व्हेरिफिकेशन आवश्यक

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेची वेबसाईट बदलली आहे. त्यामुळे पुन्हा कामावर रुजू झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थी उमेदवारांना आधार व्हेरिफिकेशन करून पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत. ज्यांनी प्रोसेस पूर्ण केली आहे त्यांचे वेतन जमा झाले आहे. ज्या उमेदवारांकडून दिलेल्या सूचनांचे पालन झाले नाही त्यांचे वेतन जमा झालेले नाही. सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आधार व्हेरिफिकेशन करून पुन्हा डॉक्युमेंट अपलोड करावेत.

संजय गुरव
सहायक आयुक्त
कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता, धाराशिव.

शासकीय आस्थापना सहकार्य करत नाहीत

शासकीय आस्थापना प्रशिक्षणार्थी तरुणांना सहकार्य करत नाहीत. हजेरी पत्रक मुद्दाम कौशल्य विभागास पाठवले जात3ल नाही. त्यामुळे पगारास दिरंगाई होते. योजना चांगली असताना शासकीय कर्मचाऱ्यांकडूनच प्रशिक्षणार्थी युवकांची पिळवणूक होत आहे.

धनाजी हुकमते
अध्यक्ष, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण संघटना.

पुन्हा पुन्हा तेच डॉक्युमेंट मागितले जातात

युवा प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही सुरुवातीला जे जे डॉक्युमेंट मागितले होते ते सर्व त्यावेळी दिले होते. आधार व्हेरिफिकेश देखील केले होते. परंतु, आता पुन्हा तेच डॉक्युमेंट मागितले जात आहेत. त्यामुळे खूप जणांचे पगार होऊ शकले नाहीत.

ज्योती कागदे
युवा प्रशिक्षणार्थी, वाशी.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra
SendShareTweet
Previous Post

6 आणि 13 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 79 वर्षाच्या नराधमाला सक्तमजुरी

Next Post

पोलिसांमध्ये क्रूरता संचारली; पवनचक्की कंपनीला मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना अमानुष मारहाण

Related Posts

धाराशिव तालुक्यातून उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सुरुवात; पहिल्याच दिवशी ‘या’ १२ उमेदवारांची माघार

January 23, 2026

छाननीनंतर ‘इतके’ अर्ज अवैध ठरले, ‘या’ तालुक्यातील एकही अर्ज अवैध नाही, छाननी प्रक्रियेची बातमी सविस्तर वाचा

January 23, 2026

हायवेवर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत आरोपींना ठोकल्या बेड्या

January 22, 2026

चुकीला माफी नाही!, झेडपी, पंचायत समितीच्या अर्जांची छाननी सुरू; नवीन नियमानुसार छाननीत बाद झालेल्या अर्जाना अपील करता येणार नाही

January 22, 2026

धाराशिव तालुक्यातून उमेदवारांची भाऊगर्दी; कोणत्या गटातून आणि गणातून ‘किती’ उमेदवारी अर्ज, वाचा सविस्तर

January 22, 2026

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपली; भाजपकडून स्वबळाची राजकीय खेळी

January 21, 2026
Next Post

पोलिसांमध्ये क्रूरता संचारली; पवनचक्की कंपनीला मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना अमानुष मारहाण

मुलींच्या इंजिनिअरिंग प्रवेशासाठी पैसे नसल्याने डकवाडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

ताज्या घडामोडी

धाराशिव तालुक्यातून उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सुरुवात; पहिल्याच दिवशी ‘या’ १२ उमेदवारांची माघार

January 23, 2026

छाननीनंतर ‘इतके’ अर्ज अवैध ठरले, ‘या’ तालुक्यातील एकही अर्ज अवैध नाही, छाननी प्रक्रियेची बातमी सविस्तर वाचा

January 23, 2026

हायवेवर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत आरोपींना ठोकल्या बेड्या

January 22, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group