आरंभ मराठी / लोहारा
लेकाने आणि सुनेने घरगुती भांडणातून वृद्ध महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना लोहारा शहरात घडली. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की,आरोपी सौदागर सुरेश रणशुर आणि पुजा सौदागर रणशुर (दोघे रा. लोहारा) यांनी दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास लोहारा येथे सौदागर यांच्या आई
उमाबाई सुरेश रणशुर (वय 55) यांना घरगुती भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन जिवे ठार मारले.
तसेच हा खून नसून आत्महत्या आहे हे दाखवण्यासाठी मृत उमाबाई यांना साडीने गळफास देवून गळफास घेवून मयत झाल्याचा बनाव केला.
याप्रकरणी उमाबाई यांचा दुसरा मुलगा महेश सुरेश रणशुर (वय 35 वर्षे) यांनी दिनांक 26 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आरोपींविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.कलम 103(1), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.