आरंभ मराठी / धाराशिव
गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून धाराशिव शहरातील 35 लोकांची 1 कोटी 6 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की,
आरोपी सुकमनी कंपनीचे चेअरमन राजेंद्र सोपान जाधव (रा. हातमोली ता. तासगाव जि. सांगली), फाउंडर लिडर मयुर कुदळे, शितल कुदळे, महादेव कुदळे (सर्व रा. सारोळा ता. जि. धाराशिव ह.मु. कोर्ट गल्ली, सांजा रोड, धाराशिव) यांनी 25 मार्च 2020 रोजी कोर्ट गल्ली येथे फिर्यादी सुरेखा महेश लोहार (वय 39 वर्षे, रा. कोर्ट कॉलनी, धाराशिव) यांची व इतर 34 इसमांची गुंतवणूकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केली.
आरोपीने 50 हजार रुपयाला 15 महिन्यामध्ये 70 हजार परतावा देतो असे अमिष दाखवून विश्वास संपादन करुन फिर्यादी व इतर 34 लोकांची 1 कोटी 6 लाख 57 हजार रुपयांची फसवणुक केली.
सुरेखा लोहार यांनी 2 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे आनंदनगर येथे भा.न्या. सं. कलम 316(2), 318(4), 3 (5) सह 3, 4 महाराष्ट्र ठेवीदाराचे संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.