आरंभ मराठी / भूम
भूम तालुक्यातील एका गावात एका चौदा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लैंगिक अत्याचार करून आरोपीने मुलीला व तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. यासंबंधी सविस्तर वृत्त असे की,भूम तालुक्यातील एका गावातील 14 वर्ष 8 महिन्याची मुलगी (नाव- गावगोपनीय) ही दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी एक वाजता आईसह घरी बसली होती.
त्यावेळी गावातील पाच तरुणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तिच्या आईस शिवीगाळ करुन घरात कोंडले व बाहेरुन कडी लावली. त्यातील एका तरुणाने मुलीला शेतात नेवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. इतर तरुणांनी शिवीगाळ करुन तू झालेल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तुला व तुझ्या आईला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली.
पीडित तरुणीच्या आईने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-64 (1), 125, 189(2), 191(2), 193(3), 190, 352, 351(3) सह पोक्सो अधिनियम 4, 8, 12 सह 92 (ड) अपंग व्यक्ती अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.