• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, February 24, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार महिने लांबणीवर ; प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 24, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.3k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतची मुदत जानेवारी 2026 मध्ये संपणार असून, गाव खेड्यातील पुढाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकांचे वेध लागले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील 428 ग्रामपंचायतीसाठी जानेवारी 2021 मध्ये पंचवार्षिक निवडणुका पार पडल्या होत्या.

त्याची मुदत एक महिन्यांनी म्हणजे जानेवारी 2026 मध्ये संपणार आहे. परंतु नगरपालिकेची मतमोजणी लांबल्यामुळे तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे ग्रामपंचायत निवडणुका घेण्यास सध्या पुरेसा वेळ नाही.

त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 428 ग्रामपंचायतींच्या निवडणुका चार ते पाच महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये होणाऱ्या या निवडणुका आता थेट एप्रिल मे 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीवर लक्ष ठेवून बसलेल्या गाव पुढाऱ्यांची निराशा झाली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील ग्रामपंचायतच्या निवडणुका 2026 मध्ये पार पडणार असल्यामुळे प्रशासनाने चार महिन्यापूर्वी ग्रामपंचायतींची सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर केली आहे. त्यानंतर गाव पातळीवर गाव पुढार्‍यांकडून निवडणुकांची तयारी करण्यात येत आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात येईल या अपेक्षेने गाव पुढाऱ्यांनी तयारी सुरू केली होती.

मात्र, नगरपालिका निवडणुकांची लांबलेली मतमोजणी, आगामी काळात महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुका यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा हा कार्यक्रम आता जानेवारी ऐवजी थेट एप्रिल – मे महिन्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जानेवारीनंतर जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासकराज येण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.

जानेवारी 2021 मध्ये ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या होत्या त्यांची मुदत जानेवारी 2026 मध्ये संपणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी नोव्हेंबर महिन्यापासूनच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, त्याच कालावधीत नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी करण्यात आलेली नाही.

पुढील पंधरा दिवसात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुढील दीड महिन्यात पार पडतील. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 31 जानेवारी 2026 च्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक केलेले आहे.

त्यामुळे 31 जानेवारी पूर्वी सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून प्राधान्याने घेतल्या जातील. सध्या संपूर्ण प्रशासन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याच्या कामात व्यस्त आहे. 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण प्रशासन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कामांमध्ये व्यस्त राहण्याची शक्यता जास्त आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम तयार करण्यास सध्या प्रशासनाकडे वेळ नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रशासनाला साधारण दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागतो. 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका पार पडल्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम तयार होऊ शकतो आणि त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात या निवडणुका होऊ शकतात.

यावर्षी ऐन उन्हाळ्यातच गाव खेड्यातील राजकारण ग्रामपंचायतच्या निवडणुकांमुळे तापणार आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबल्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्यातील 428 ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नेमले जाणार आहेत. 2021 मध्ये झालेल्या निवडणुकांच्या पूर्वीदेखील तीन ते चार महिने याच 428 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले होते.

तालुकानिहाय निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या

तालुका – ग्रामपंचायत संख्या

धाराशिव – ६६
तुळजापुर – ५३
उमरगा – ४९
लोहारा – २६
कळंब – ५९
वाशी – ३४
भूम – ७१
परंडा – ७०

एकूण – ४२८

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#elections#grampanchayats#district#process#appointing#started#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

मुलाला किडनॅप करण्याची धमकी देऊन वाईन शॉप चालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

Next Post

ख्रिसमसच्या सलग सुट्ट्यामुळे तुळजाभवानी मातेच्या दर्शन रांगेत बदल

Related Posts

2020 पिक विमा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; साडेतीन लाख शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

February 23, 2026

धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर परिणाम

February 23, 2026

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांकडेच राहणार; राज्य शासनाची अधिसूचना जारी

February 21, 2026

धक्कादायक! सावत्र मुलाकडूनच आईवर लैंगीक अत्याचार; साथीदारासह मारहाण

February 21, 2026

काम न करता सात लाखांचा अपहार; बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

February 19, 2026

लोहटा पश्चिम शिवारात गुप्त अफू शेतीचा पर्दाफाश; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

February 18, 2026
Next Post

ख्रिसमसच्या सलग सुट्ट्यामुळे तुळजाभवानी मातेच्या दर्शन रांगेत बदल

किचनचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार

ताज्या घडामोडी

2020 पिक विमा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; साडेतीन लाख शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

February 23, 2026

धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर परिणाम

February 23, 2026

चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुण – तरुणीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

February 22, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group