आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगर परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपल्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला गति देण्यासाठी एक मोठी मार्गदर्शन सभा आयोजित केली आहे. या सभेला युवा नेतृत्व सुजात प्रकाश आंबेडकर मागदर्शन करणार आहेत.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मोठी ताकद मिळणार आहे.या सभेची तयारी सुरू झाली आहे.
ही सभा शहरात 26 नोव्हेंबर रोजी होत असून, प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर धाराशिवमध्ये उपस्थित राहून आघाडीची भूमिका मांडणार आहेत.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरसेवक तसेच नगराध्यक्षपदासाठी उमेदवार देण्यात आले असून,प्रचाराची सुरुवात झाली आहे. दरम्यान, शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदारांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारांना मजबुती देऊन लोकाभिमुख कार्यसंस्कृतीचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सभा निर्णायक ठरणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले आहे.
क्रांती चौक, भिमनगर, येथे ही सभा आयोजित करण्यात आली असून,26 तारखेला सायंकाळी ६.३० वाजता सभा होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण डिकले, जिल्हा संघटक विकास बनसोडे व शहराध्यक्ष नामदेव वाघमारे यांनी दिली आहे.










