आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील भाजपला आज मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी नगरसेवक संभाजी सलगर यांच्यासह अनेक महत्वाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
सलगर यांच्यासोबत अजय नाईकवाडी, अविनाश शाबादे, महेश शिंदे, महाडिक सर, कोरे सर, राहुल सलगर, नंदकुमार देशमाने, अंकुश काकाजी, राजेंद्र शिंदे, रामचंद्र कसबे, महेश नरवडे, विवेक मुळे, ऋषिकेश कपाळे, पोपट कासार, आर्यन सलगर, गौरव सलगर, भोलेनाथ मधुरकर, नागेश मधुरकर, नवनाथ शेरकर, लखन शेरकर आदींनी शिवसेनेचा भगवा हातात घेतला.
यापूर्वी दोन दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा समन्वयक दिनेश बंडगर आणि माजी नगराध्यक्ष दत्ताभाऊ बंडगर यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेनेला फटका बसणार अशी चर्चा होती. मात्र सलगर यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून भाजपावर करण्यात आला आहे.
सलगर म्हणाले की हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी आणि उद्धवसाहेबांचे संवेदनशील नेतृत्व पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी प्रवीण कोकाटे, सोमनाथ गुरव, संग्राम देशमुख, बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, पंकज पाटील, अभिजित देशमुख, हनुमंत देवकते, कोळी सर, गणेश खोचरे, राज निकम, परवेज काझी, मनोज पडवळ, महेश लिमये, पंकज स्वामी, गफूर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.









