आरंभ मराठी / धाराशिव
अल्पवयीन मुलीचे बनावट आधारकार्ड बनवून तिला सज्ञान दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यासंबधी सविस्तर वृत्त असे की, 16 वर्षे 9 महिने वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीसोबत (नाव- गाव गोपनीय) दिनांक 21 जानेवारी 2025 ते 23 डिसेंबर 2025 या काळात एका गावातील तरुणाने प्रेमसंबंध निर्माण केले.
मुलीला सज्ञान दाखवण्यासाठी तिचे बनावट आधारकार्ड बनवून ती 19 वर्षाची असल्याचे दाखवले. त्यानंतर त्या तरुणाने मुलीला आणि तिच्या आई वडिलांना तिचे लग्न लावण्यास भाग पाडले. तरुणाने तिच्यासोबत बालविवाह करुन तिच्यावर लैंगीक अत्याचार केला.
यासंदर्भात पिडीत तरुणीच्या आईने दिनांक 28 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64 (2)(एफ),64(2) (एम), 340(2),336,(3) सह कलम 7,10 बालविवाह अधिनियम सह पोक्सो कलम 4, 8, 12 अन्वये त्या तरुणाविरुद्ध धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.









