प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिव जिल्हा पत्रकार संघ आणि पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी शनिवारी (दि.६) पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबिर येडशी रोड, छायादीप मंगल कार्यालयासमोर पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे होणार असून या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार अनंत अडसूळ, कमलाकर कुलकर्णी हे राहणार आहेत. या शिबिरामध्ये रक्तदाब, थायरॉईड, शुगर लेवल, ईसीजे, हिमोग्लोबिन, हाडांची तपासणी, पोटाचे विकार, डोळे तपासणी, तसेच लहान मुले, महिला तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. या आरोग्य तपासणी शिबिरासाठी तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. रणजीत कदम, डॉ. वीरेंद्र गवळी, डॉ. बालाजी लोमटे, डॉ. विकास बाराते, डॉ. नितीन भोसले, डॉ. पवन महाजन हे तपासणी करणार आहेत. या शिबिराचा पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख, सरचिटणीस भीमाशंकर वाघमारे, पल्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. रणजीत कदम, जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी रवी केसकर, चेतन धनुरे, बाबुराव चव्हाण, देवीदास पाठक, महेश पोतदार, बालाजी निरफळ, सयाजी शेळके, तानाजी जाधवर, जी. बी.राजपूत, धाराशिव तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कदम, अझर शेख, राजेंद्रकुमार जाधव, राकेश कुलकर्णी, प्रवीण पवार, बालाजी सुरवसे, प्रा. अभिमान हंगरकर, अमोल गाडे, शीतल वाघमारे, विकास सूर्डी, संजय पाटोळे, कालिदास म्हेत्रे, आरिफ शेख, सुधीर पवार, ज्ञानेश्वर पाटील, ओंकार कुलकर्णी, संजय शिंदे, शिवराज गव्हाणे, पाडूरंग पवार यांच्यासह सर्व आठही तालुका कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.