आरंभ मराठी/ धाराशिव
संपूर्ण महाराष्ट्राला ओळख असलेल्या धाराशिवच्या मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी आकाश मिलिंदराव कोकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. समितीच्या बैठकीत बुधवारी सकाळी ही निवड करण्यात आली. यावेळी निवडीबद्दल मान्यवरांनी कोकाटे यांचा सत्कार केला तसेच शुभेच्छा दिल्या.
धाराशिवमध्ये दरवर्षी मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. 2026 च्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या अध्यक्ष निवडीसाठी बुधवारी सकाळी शहरातील हॉटेल रोमा येथे समितीच्या मार्गदर्शक मान्यवरांची तसेच शहरातील शिवप्रेमींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते आकाश मिलिंदराव कोकाटे यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर मान्यवरांनी आकाश कोकाटे यांच्या नावाची घोषणा केली. कोकाटे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळचा शिवजन्मोत्वाचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी समितीचे पदाधिकारी, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









