प्रतिनिधी / दहिफळ
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे युवासेना व शिवसैनिकांच्या वतीने खासदार ओमराजे निंबाळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत श्री खंडोबाला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या दिर्घायुष्यासाठी महाभिषेक करण्यात आला.तसेच येथील जि प प्रशालेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त हा चांगला उपक्रम आहे.परंतू शाळेत अनेक समस्या आहेत.विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवणे गरजेचे आहे.तसेच संगणक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी संगणकाचे संच शाळेला भेट दिले तर विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळेल.सध्या स्पर्धेचे युग आहे.स्पर्धेत विद्यार्थी टिकला पाहिजे.शालेला इमारत मोठी आहे.काही वर्ग खोल्या मोकळ्या आहेत तिथे अभ्यासिका केंद्र सुरू करायचे आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.आम्ही शिकवायला कमी नाहीत.इतर सुविधा उपलब्ध झाल्यातर अधिक गुणवत्ता वाढीसाठी मदत होईल.अशी मागणी उपस्थित नेते मंडळींकडे केली. बालाजी मते यांनी मागणीचे प्रस्ताव तयार करून आम्ही पाठपुरावा करून काही तरी शाळेसाठी देऊ असा आशावाद व्यक्त केला.
यावेळी उपसरपंच अभिनंदन मते, बाबासाहेब भातलवंडे,अमर भातलवंडे,माजी उपसरपंच बालाजी मते, श्रीकांत धोंगडे, वसंत धोंगडे,सुजीत भातलवंडे, किरण भातलवंडे,भैय्या भुसारी, दत्ता कागदे, ऋषिकेश पाटील,तुकाराम भातलवंडे, सुर्यकांत ढवळे, महादेव कांबळे,अदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक पाखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन भडके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक विलास मुंडे , महेश पारखे ,राजेश सोनवळकर ,प्रशांत गवळी ,दत्तात्रेय मुंडे ,ओंकार घोडके ,अनिल भडके ,नवले,शिक्षिका,श्रीमती माने ,श्रीमती आत्तार आदींनी परिश्रम घेतले.