• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, April 8, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव जिल्हा वार्षिक योजनेत मोठा गैरव्यवहार? प्रशासकीय मान्यता व निधी वितरणातील अनियमिततेची आमदार कैलास पाटील यांची मागणी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 8, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ व २०२५-२६ अंतर्गत सन २०२५-२६ मध्ये देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता व निधी वितरण प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांच्याकडून करण्यात आला असून, याप्रकरणी सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात कैलास बाळासाहेब घाडगे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या नियोजन विभागाकडे तक्रार सादर केली आहे. तक्रारीनुसार, जिल्हा नियोजन समिती कार्यालय, धाराशिव यांच्यामार्फत विविध लेखाशिर्ष व यंत्रणांकडून प्राप्त प्रस्तावांच्या आधारे अनेक कामांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरित करण्यात आला. मात्र, मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

विशेष म्हणजे, सामाजिक वनीकरण विभागासाठी ‘मध्यवर्ती रोपमळे’ या क्षेत्रासाठी केवळ १०० लाख रुपयांची तरतूद असताना तब्बल ६३४.५५ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून ६३६.४७ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

तसेच, पर्यटन विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांसाठी जिल्हा नियोजन समितीची पूर्वमान्यता आवश्यक असतानाही, काही विशिष्ट स्थळांना प्राधान्य देत इतर गरजेच्या पर्यटन स्थळांना वंचित ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित स्थळांना समितीची मान्यता नसतानाही प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयानुसार, सर्व प्रस्तावित कामांवर जिल्हा नियोजन समितीसमोर चर्चा करून मान्यता घेणे बंधनकारक असताना, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत संबंधित कामांची यादी सादर न करता व चर्चा टाळून थेट प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचेही समोर आले आहे.

यामुळे लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, पुनर्विनियोजन करतानाही जिल्हा नियोजन समितीची मान्यता न घेता परस्पर निधी वळवून कामांना मंजुरी देण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.

शासनाच्या परिपत्रकानुसार लोकप्रतिनिधींना सन्मानपूर्वक वागणूक देणे व त्यांच्या पत्रव्यवहारावर तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित असतानाही त्याचे उल्लंघन झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या सर्व बाबींचा विचार करता, संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर प्रकरणामुळे जिल्हा नियोजन समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #Dharashiv#District#MLA#KailasPatil#demand#approval#fund
SendShareTweet
Previous Post

भूम नगरपरिषदेच्या घोटाळ्यात न्यायालयाने ५० कोटींचे देयक रोखले; मुख्याधिकाऱ्यांना बजावली नोटीस

Related Posts

भूम नगरपरिषदेच्या घोटाळ्यात न्यायालयाने ५० कोटींचे देयक रोखले; मुख्याधिकाऱ्यांना बजावली नोटीस

April 7, 2026

ट्रेडिंगच्या आमिषाने डॉक्टरची 63.50 लाखांची सायबर फसवणूक; गुन्हा दाखल

April 7, 2026

आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार

April 7, 2026

वडिलांच्या हातून पत्नी-मुलीची निर्घृण हत्या; उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना

April 7, 2026

धाराशिव बसस्थानकात NCMC कार्ड सेवा पुन्हा सुरू; आरंभ मराठीच्या पाठपुराव्यानंतर प्रवाशांना दिलासा

April 7, 2026

लाडकी बहीण योजनेतून जिल्ह्यातील सव्वा लाख महिला बाद, केवायसी करूनही 38 हजार महिलांना हप्ता नाही

April 7, 2026

ताज्या घडामोडी

धाराशिव जिल्हा वार्षिक योजनेत मोठा गैरव्यवहार? प्रशासकीय मान्यता व निधी वितरणातील अनियमिततेची आमदार कैलास पाटील यांची मागणी

April 8, 2026

भूम नगरपरिषदेच्या घोटाळ्यात न्यायालयाने ५० कोटींचे देयक रोखले; मुख्याधिकाऱ्यांना बजावली नोटीस

April 7, 2026

ट्रेडिंगच्या आमिषाने डॉक्टरची 63.50 लाखांची सायबर फसवणूक; गुन्हा दाखल

April 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group