प्रतिनिधी / बीड
बीड तालुक्यातील परळी रोडवरील श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे दरवर्षीप्रमाणे सोमवारी विविध उपक्रमाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. बीड जिल्ह्यात ओळख निर्माण करणाऱ्या गोरक्षनाथ टेकडीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या संस्थानचे मठाधिपती शांती ब्रह्म नवनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमाने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी विविध भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत किसन बाबा यांच्या आशीर्वादाने परिसरातील नागरिक गुरुपौर्णिमा शांती ब्रह्म नवनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरी केली जाते. सोमवारी श्री गोरक्षनाथाची प्राप्त महाआरती करण्यात आली या आरतीसाठी पहाटे पाच वाजेपासून भाविकांनी गर्दी केली होती.आरती झाल्यानंतर गडावर भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शांतिब्रह्मम नवनाथ बाबा यांच्या पालखीची मिरवणूक गडाच्या पायथ्यापासून मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत काढण्यात आली.यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. त्याचबरोबर विविधतेने नटलेल्या गोरक्षनाथ टेकडीवर प्रत्येक पौर्णिमेला कीर्तनाचे आयोजन केले जाते. हरिभक्त हभप सय्यद महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. नाथाच्या पायथ्याशी असलेल्या बकरवाडीला अन्नदान करण्याचा मान मिळाला. बाबा यांच्याकडून अनेक भाविकांनी गुरु मंत्र देखील घेतला.