प्रतिनिधी / कळंब
जिल्ह्यातील सक्षम बाजारपेठ असलेल्या कळंब येथील नागरिकांच्या सेवेत दिशा नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा रविवारी सुरू करण्यात आली आहे. यामुळे खातेदार,व्यापारी, नौकरदार, बचतगट ठेवीदारांना शहरात बैंकिंग सेवा उपलब्ध झाली आहे. दिशा पतसंस्थेच्या वतीने ग्राहकांना दर्जेदार अत्याधुनिक बँकींग सेवा देण्यात येणार असल्याचे संस्थापक चेअरमन डॉ. दिग्गज दापके-देशमुख यांनी सांगितले.
अल्पावधीतच ३०० कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार करुन जिल्ह्यात सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या धाराशिव येथील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या कळंब शाखेचा शुभारंभ रविवारी (दि.९) ह. भ. प. गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले व नॅचरल समूहाचे संस्थापक-अध्यक्ष बी. बी.ठोंबरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा
दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या खातेदारांना अत्याधुनिक बँकिंग सेवा दिल्या जातात. पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह सर्व शाखांमध्ये लॉकर, आयएमपीएस, एनइएफटी, आरटीजीएस सेवा उपलब्ध असून क्यूआर कोड आणि मोबाइल बैंकिंग लॉकर सेवा देखील उपलब्ध करुन देण्यात आल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. दिग्गज दापके यांनी केले. नँचरल उद्योग समुहाचे संस्थापक बी.बी.ठोंबरे यांनी पतसंस्थांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाल्याचे मत व्यक्त केले. कळंबसारख्या शहरात पैशाची व व्यापारी विचारांची संस्कृती असल्याने येथे संस्था अधिक घौडदौड करेल, असा विश्वास ह.भ.प.गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले यांनीनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव डॉ रमेश दापके -देशमुख, दिशा पतसंस्थेचे उपाध्यक्ष राहुल माकोडे, सचिव पंकज पडवळ, संचालिका डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख,शुभांगी पडवळ, संचालक डॉ. इलियास खान, बाळासाहेब वाघ,मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर तडवळकर, गजानन पाटील, शशिकांत करंजकर,माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, शिवसेवा युवक मंडळाच्या सचिव सारिका जाधव, वैद्यकीय अधीक्षक मंजुश्री शेळके, साई पतसंस्थेचे चेअरमन सागर मुंडे, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक अतुल गायकवाड,जेष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष हभप महादेव महाराज अडसूळ, आरपीआयचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी शिरसट, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे, भाजपचे राज्य परिषद सदस्य शिवाजी गिड्डे, पांडुरंग आवाड, शाखाधिकारी दत्ता शेटे, कर्मचारी विशाल कुंभार, भरत अंबिरकर, अक्षय गुंजाळ, पूनम हजारे, सत्यजित तुपारे, यांच्यासह व्यापारी व नौकरदार वर्ग प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आदर्श शिरसट यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष राहुल माकोडे यांनी केले.
मार्चअखेर ३०० कोटीचा व्यवसाय
दिशा नागरी सहकारी पतसंस्थेने मार्चअखेर ३०० कोटी रूपयाच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. स्थापनेपासून पतसंस्थेचा ऑडिट वर्ग अ असून स्थापनेच्या दुसऱ्या वर्षापासून सभासदांना दरवर्षी लाभांश देण्यात येत आहे. सर्व शाखांमध्ये अवघ्या १० मिनिटांत सोनेतारण कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज देखील अत्यल्प व्याजदरावर देण्यात येते. ठेवींवर आकर्षक व्याजदर देणारी ही पतसंस्था असल्याचे यावेळी सांगण्यात आले.