जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा सुरू झाल्या आहेत, या पार्श्वभूमीवर निसर्गाकडे गाऱ्हाणे मांडणारी काव्य रचना महेश पाटील यांनी केली आहे.
“कष्टाचे ओझे पाठीवरून वाहतो
हिरवा शिवार वाळला तो पाहतो.”
“गारा वारा वादळी पाऊस झाला नाहीसा.”
“रिमझीम पाऊस श्रावणात तरी पड पाऊसा.”
“विखुरलेल्या बी बीयाणात जणू अनेक होते स्वप्न.”
“कर्जबाजारी होऊन शेतीच्या प्रगतीचा होता प्रयत्न.”
“निसर्गाकडे पाहून अनेक डोळे विसावले.”
“पशुधनाला लंम्पी आजाराने धास्तावले.”
“अनेक गोष्टी निसर्गाच्या लोटल्या कुशीत.”
“राञं न दिवस विचार विसावतो उशीत.”
“निसर्ग राजा किती घेशील रे सांग परीक्षा
शेतकरी जन्म म्हणून ही आमची का शिक्षा.”
शब्दप्रवाह..
महेश पाटील,