आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये इनकमिंग सुरू असताना आता भाजप तसेच काँग्रेस पक्षातूनही शिवसेना उबाठा गटामध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. आमदार कैलास पाटील, तालुका प्रमुख सतीश सोमाणी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांनी आज शिवसेना उबाठा गटामध्ये प्रवेश केला.
धाराशिव तालुक्यातील आरणी येथील भाजप व काँग्रेसमधील युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. आमदार कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आरणी येथील महादेव घुटे, बालाजी अंबाडे, नवनाथ घुटे, ज्ञानेश्वर अंबाडे, बळीराम घुटे, किरण घुटे, रामदास शिंदे, गोपाळ साबळे, महेश शिंदे, मारुती घुटे, चंद्रकांत गुळवे, बाळासाहेब चौरे, गणेश शिंदे, शरद शिंदे, बंडू शिंदे, गोविंद शिंदे, अर्जुन कोकाटे, मेघराज घुटे यांच्यासह अनेक युवकांनी भगव्या झेंड्याखाली उभे राहण्याचा निर्णय घेतला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, खासदार ओमराजे निंबाळकर आणि सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत करत पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेशामुळे आरणी गावात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला निर्णायक बळ मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे. यावेळी मुन्ना खटावकर, मंगेश पांगरकर, अविनाश आगाशे, मंगेश गरड, फैसल काझी, अमित शिंदे, योगेश गरड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









