आरंभ मराठी / लोहारा
अवैध गांजा विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी मोठी कारवाई केली. लोहारा पोलीस ठाणे हद्दीतील जेवळी (उत्तर) येथे आरोपी गोरीबी जबार शेख (वय ७८) व अली अकबर अब्दुल शेख, दोघेही रा. जेवळी उत्तर, ता. लोहारा, जि. धाराशिव यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता ५.२६६ किलो वजनाचा गांजा सदृश अमली पदार्थ आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची अंदाजे किंमत १ लाख ५ हजार ३२० रुपये इतकी असून, तो चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपींनी स्वतःच्या कब्जात बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी लोहारा पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून संबंधित दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेचा पुढील तपास लोहारा पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे.









