आरंभ मराठी / उमरगा
लातूर–उमरगा रोडवर आज (3 डिसेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास मोटारसायकलला इनोव्हा कारची जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आईचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
बाबळसूरहून नारंगवाडीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला (MH25 J 5220) पाठीमागून आलेल्या इनोव्हाने (MH12 XX 3713) जोरात धडक दिली. अपघातात भिमाबाई गणपती बिराजदार (62) आणि प्रेमनाथ गणपती बिराजदार (45, रा. बाबळसूर) हे दोघेही रस्त्यावर फेकले गेले.गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही तातडीची मदत मिळाली.
अपघाताची माहिती मिळताच उमरगा चौकातील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका त्वरित घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक शेषराव लवटे यांनी जखमींना तातडीने उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान भिमाबाई बिराजदार यांना मृत घोषित केले. प्रेमनाथ यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.









