आरंभ मराठी / धाराशिव
न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे स्थगित झालेल्या धाराशिव नगरपालिकेतील तीन जागांसाठी (प्रभाग क्र. 2 अ, 7 ब आणि 14 ब) अखेर सुधारित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर रोजी उशिरा जाहीर केला. चार दिवसांपूर्वी या जागांवरील निवडणुकांना स्थगिती लागू करण्यात आली होती.
त्यामुळे उमेदवार, प्रशासन व नागरिकांचे लक्ष या सुधारित कार्यक्रमाकडे लागले होते. न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांमुळे बाधित झालेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने खालीलप्रमाणे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे :
सुधारित निवडणूक कार्यक्रम :
जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख :
०४ डिसेंबर २०२५
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक :
१० डिसेंबर २०२५, दुपारी ३.०० वाजेपर्यंत
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक :
११ डिसेंबर २०२५
आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक :
२० डिसेंबर २०२५
(सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक :
२१ डिसेंबर २०२५, सकाळी १०.०० वाजल्यापासून
शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्याची अंतिम तारीख :
२३ डिसेंबर २०२५
दरम्यान, २ डिसेंबर रोजी इतर प्रभागांमध्ये होणाऱ्या मतदानाची मतमोजणी ३ डिसेंबरलाच नियोजित कार्यक्रमानुसार पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. सुधारित कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे स्थगित ठेवलेल्या तीनही जागांवरील निवडणूक प्रक्रिया आता गतीने पार पडण्याची अपेक्षा आहे.












