आरंभ मराठी / भूम
भूम शहरातील नागोबा चौक येथे व्यवसायाच्या नावाखाली एकाची तब्बल 13 लाख 15 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसाद उर्फ पंकज शिवापा उंबरे (रा. रथ गल्ली, भूम) यांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2021 ते 27 ऑक्टोबर 2022 या कालावधीत फिर्यादी पोपट पिंटू मिछद भारती (वय 49 वर्षे, रा. आलमप्रभू रोड, गालीब नगर, भुम) यांच्याकडून व्यवसायासाठी आर्थिक अडचण असल्याचे सांगून एकूण 13,15,000 रुपये इतकी रक्कम उधारीवर घेतली.
मात्र, संबंधित रक्कम परत न करता फिर्यादीचा विश्वासघात करून गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे बुडवले. याबाबत फिर्यादी पोपट भारती यांनी दिनांक 25 ऑक्टोबर 2025 रोजी भुम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.द.वि. कलम 420 (फसवणूक), 406 (विश्वासघात), 506 (धमकी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुम पोलिसांकडून सुरू आहे.









