आरंभ मराठी / वाशी
वाशी परिसरातील पवनचक्की कंपनीचे अज्ञात व्यक्तीने तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, दिनांक 13 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट यादरम्यान टाटा पावर टि.पी. वर्धमान सुर्या लि. कंपनीचे गोजवाडा लोकेशन नंबर के.टी. 14, इंदापूर येथील लोकेशन नं के.टी. 03, लोकेशन क्र. के.टी. 22 येथे पवनचक्कीच्या नेसल मधील ट्रान्सफॉर्मर, जनरेटर, गिअरबॉक्स तोडून फोडून तसेच पावर सप्लाय केबल व इतर तांब्याचे केबलचे तोडून एकुण 1 कोटी 48 लाख रुपयांचे अज्ञात व्यक्तीने नुकसान केले.
याप्रकरणी फिर्यादी दत्तात्रय शिवाजी माने (वय 40 वर्षे, शिरगाव ता.वाई जि. सातारा, ह.मु. पार्क वाशी) यांनी दिनांक 10 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे वाशी येथे भा.न्या.सं.कलम 324 (5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.