आरंभ मराठी / धाराशिव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा आज (दि.३) ब्रॉंझपदक देऊन गौरव करण्यात आला.
आकांक्षीत जिल्हा वर्गवारीत धाराशिव जिल्ह्यासाठी तर आकांक्षीत तालुका वर्गवारीत परंडा तालुक्यासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आयआयएम नागपूर येथे आयोजित महसूल परिषद कार्यक्रमात, नीती आयोगाद्वारे आकांक्षित जिल्हा व तालुका विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘संपूर्णता अभियाना’त विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये
आकांक्षित जिल्हा पुरस्कार श्रेणीत धाराशिवचे जिल्हाधिकारी पुजार यांना ब्राँझ पदक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी नंदुरबार, गडचिरोली आणि वाशीम जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा देखील गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पुजार यांना आकांक्षीत तालुका पुरस्कार श्रेणीतून परंडा तालुक्यासाठी देखील पुरस्कार देण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यात विकासाचे विविध उपक्रम राबविण्यात येत असून, आकांक्षीत जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसून जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा राज्य सरकारने गौरव केला आहे.