आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून नीता अंधारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर विकास विभागाच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
नीता अंधारे या यापूर्वी बीड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होत्या.१ ऑगस्ट रोजी निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार त्यांची बीड येथून धाराशिव येथे बदली करण्यात आली आहे. त्या सोमवारी (दि.४) धाराशिव येथील पालिकेचा पदभार घेतील.
मागील दोन महिन्यांपासून धाराशिव नगर परिषदेत अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. पालिकेत झालेले घोटाळे, कर्मचाऱ्यांची रिक्त झालेली पदे तसेच शहरातील पायाभूत सुविधांचा उडालेला बोजवारा यामुळे पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नवीन मुख्याधिकाऱ्यांवर व्यवस्था सुधारण्याचे मोठे आव्हान असून, त्यात काही बदल होतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुढील काही महिन्यात पालिकेच्या निवडणुका होणार असल्यामुळे नवीन मुख्याधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असणार आहे. अंधारे यांनी बीड येथील बजावलेल्या कामगिरीचा धाराशिव शहराला फायदा होईल असे बोलले जात आहे.