आरंभ मराठी / तुळजापूर
श्री तुळजाभवानी मंदिरातील सुरू असलेल्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे श्री तुळजाभवानी मातेचे धर्मदर्शन व पेडदर्शन दिनांक ०१ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे मंदिर संस्थानकडून कळवण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनच्या स्वनिधीतून ५८ कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे सिंहाच्या गाभाऱ्यात पुरातत्त्व खात्यामार्फत दिनांक १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत जिर्णोध्दाराचे काम पार पडणार आहे.
त्यामुळे या काळात धर्मदर्शन व पेडदर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच यावेळी इतर धार्मिक विधी, सिंहासन पूजा, अभिषेक पूजा व मुखदर्शन हे मात्र नियमितपणे चालू राहणार असल्याचे मंदिर संस्थानने कळवले आहे. याबाबत सर्व महंत, पुजारी, सेवेकरी व भाविक यांनी नोंद घ्यावी असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनकडून करण्यात आले आहे.