आरंभ मराठी / धाराशिव
आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून धाराशिव शहरातील विनोद गपाट यांची पुणे येथील आरोपींनी तब्बल 29 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की, आरोपी सोमनाथ कोंडे (रा. मधुसुधन पार्क बिबेवाडी पुणे) यांनी दिनांक 25 जानेवारी 2025 ते आतापर्यंत महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा धाराशिव येथे फिर्यादी विनोद शिवाजीराव गपाट (वय 49 वर्षे, रा. आनंदनगर धाराशिव) यांचा विश्वास संपादन करुन विनोद यांना आर्थिक फायदा करुन देतो असे सांगितले.
आरोपींनी गपाट यांना पुणे सातारा रोडवरील महालक्ष्मी रिअल इस्टेट व हॉटेल रोहित गार्डन येथे एकुण 29,00,000 रुपये गुंतवणुक करायला सांगितली. गपाट यांनी गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणुकीचा फायदा व नफा परत न करता विनोद गपाट यांची आर्थिक फसणुक केली.
विनोद गपाट यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 316 (2),318(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.