• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Wednesday, December 3, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Manoj jarange Patil शपथेवर सांगतो.. जरांगे-पाटील देतील त्याच उमेदवाराला निवडून आणू..धाराशिवमध्ये इच्छूक उमेदवारांनी दिलेले शपथपत्र पोहोचले मनोज जरांगे पाटलांकडे

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 2, 2024
in Breaking
0
0
SHARES
4.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव
मराठा आरक्षणाच्या भूमिकेशी सहमत असलेले उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतल्यानंतर इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र यातून एकच उमेदवार निवडण्याची प्रक्रिया कठीण आहे.त्यामुळे इच्छुकांमध्ये एकमत करा,असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले होते.त्यावर एकमत होत नसले तरी संभाव्य फूट टाळण्यासाठी जरांगे पाटील देतील त्याच उमेदवारांना निवडून आणू, आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊ, अशी शपथच धाराशिवमधील इच्छुक उमेदवारांनी शनिवारी झालेल्या बैठकीत घेतली असून, हे शपथपत्र अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले आहे.

मराठा समाजासोबत मुस्लिम तसेच दलित समाज एकजुटीने विधानसभेची निवडणूक लढवणार असून, उद्या म्हणजेच रविवारी सायंकाळी उमेदवारांच्या नावाची घोषणा अंतरवाली सराटीतून स्वतः मनोज पाटील करणार आहेत. मात्र प्रत्येक मतदारसंघातून अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असल्याने आणि यातून एकाचीच निवड करायची असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. मात्र आपण सांगितल्यानंतर एकानेच उमेदवारी अर्ज ठेवायचा आणि अन्य इच्छुकांनी अर्ज मागे घ्यायचे, असे आवाहन मनोज पाटील यांनी केले आहे. त्यांच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो, हे चार तारखेलाच कळणार आहे. मात्र धाराशिवमधील 19 इच्छुक मराठा उमेदवारांनी शनिवारी दुपारी शहरात बैठक घेतली. ही बैठक नावावर एकमत करण्यासाठी होती.या बैठकीला काही राजकीय पक्षाचे तसेच आंदोलनात सक्रिय असलेले इच्छुक कार्यकर्ते एकत्र आले होते. यावेळी सर्वांच्या बोलण्यात एकवाक्यता आली.

शपथपत्र दिल्याने वाद संपुष्टात

मनोज पाटील यांनी दिलेल्या कोणत्याही एका उमेदवाराचा जोरकसपणे प्रचार केला जाईल आणि अन्य सर्व इच्छुक उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. इच्छुक उमेदवारांची ही एकवाक्यता तत्कालीक आहे की कायम राहणार, यासंदर्भात संभ्रम नको म्हणून काही आंदोलकांनी ही बाब शपथपत्रावर लिहून देण्याची सर्व इच्छुक उमेदवारांकडे विनंती केली. तेव्हा सर्व इच्छुक उमेदवारांनी शपथपत्रावर लिहून दिले. त्यात आम्ही इच्छुक उमेदवार मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या उमेदवाराचाच प्रचार करू, अन्य सर्व इच्छुक उमेदवार माघार घेऊ. लिहून दिलेले शपथपत्र शनिवारी सायंकाळी आंदोलकांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे धाराशिव मतदारसंघात मराठा समाजाचा एकच उमेदवार राहील, बंडखोरी किंवा गोंधळ होणार नाही,अशी सध्याची एकंदर स्थिती आहे.

जरांगे- पाटलांची संकल्पनेला दाद
धाराशिवचे शिष्टमंडळ शनिवारी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेले.त्यांनी धाराशिवच्या इच्छुक उमेदवारांनी दिलेले शपथपत्र दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी या संकल्पनेचे कौतुक केले.या पद्धतीने अन्य मतदारसंघातून देखील शपथपत्र घेण्याचा निर्णय झाला.त्यानुसार अन्यत्र अशाच पद्धतीने शपथपत्र दिले जात आहेत. या शपथपत्रामुळे मराठा समाजातील इच्छुक उमेदवारांमध्ये अंतर्गत बंडखोरी किंवा वाद वाढणार नाहीत, असा दावा मनोज जरांगे यांचे समर्थक करत आहेत.

उद्या सायंकाळी ठरणार उमेदवार
मराठा समाजाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या उमेदवाराची उद्या सायंकाळी मनोज पाटील घोषणा करणार आहेत. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघात राजकीय समीकरण बदलणार आहे.मनोज जरांगे पाटील कोणाला उमेदवारी देतात याकडे मतदारसंघांचे लक्ष लागले आहे.

Tags: #cmomaharashtra #eknathshinde #devendraphadanvis #ajitdadapawar #Osmanabad #dharashiv
SendShareTweet
Previous Post

Farmer’s News आचारसंहितेत अडकलेल्या मदतीच्या प्रस्तावांना अखेर मंजुरी, शेतकऱ्यांची दिवाळी गोड; अतिवृष्टीच्या नुकसानीचे 313 कोटी मंजूर

Next Post

Big Breaking धाराशिवसह भूम-परंडा मतदारसंघात मराठा उमेदवार देण्याचा निर्णय, तुळजापूरबाबत थोड्या वेळातच निर्णय

Related Posts

स्थगिती दिलेल्या ‘त्या’ तीन जागांसाठी निवडणूक आयोगाचा सुधारित कार्यक्रम जाहीर

November 30, 2025

धाराशिव नगरपालिकेतील ‘या’ तीन जागांवरील निवडणूक स्थगित

November 27, 2025

ढोकीजवळ रस्त्यालगत अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ

November 27, 2025

लाडक्या गुत्तेदाराला पाठीशी का घालता..?, १५ टक्के वाढीव टेंडरसाठी अट्टाहास; शिवसेनेचा भाजपवर थेट आरोप..होय,आम्हीच तक्रार केली,चुकीच्या पद्धतीला आळा घातला !

October 31, 2025

ब्रेकिंग न्यूज..धाराशिव शहरात अखेर रस्त्याचे काम सुरू; धाराशिवकरांची खड्ड्यातून सुटका होणार..!

October 30, 2025

Big Breaknig तुळजाभवानीचा मायेचा हात; मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटींची मदत, आरंभ मराठीच्या वृत्तानंतर प्रशासनाचा तातडीने निर्णय

September 27, 2025
Next Post
तेच ठिकाण,तोच नेता, तीच गर्दी: मनोज जरांगे-पाटील पुन्हा गाजवणार सभा

Big Breaking धाराशिवसह भूम-परंडा मतदारसंघात मराठा उमेदवार देण्याचा निर्णय, तुळजापूरबाबत थोड्या वेळातच निर्णय

Manoj jarange Patil निवडणुकीतून माघार; मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय

ताज्या घडामोडी

तुळजापुरात सर्वाधिक मतदान,धाराशिवमध्ये निराशाजनक स्थिती, जिल्ह्यात सरासरी 68.97% मतदान

December 3, 2025

शेवटच्या तासात धाराशिवमध्ये ‘या’ मतदान केंद्रावर उसळली गर्दी

December 2, 2025

आठ तासांत ‘इतके’ टक्के मतदान; भूम आणि तुळजापूर आघाडीवर, धाराशिवमधे टक्केवारी घसरली

December 2, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group