प्रतिनिधी | येडशी
येडशी येथील सिद्धेश्वर मंदिर ते दत्त मंदिर स्टेशन रोडबाबत तहसीलदार बिडवे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
येडशी येथील शेतकऱ्यांची स्टेशन रोडला व शेतीसाठी जाण्यासाठी रस्त्याची मागणी आहे. गावातून सिद्धेश्वर मंदिरापासून हा रस्ता पुढे दत्त मंदिराजवळ जोडल्यास गावच्या पूर्वेच्या भागातील शेतकऱ्यांची तसेच ग्रामस्थांची स्टेशनवर जाण्याची सोय होणार आहे.याबाबत ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे,तहसीलदार बिडवे यांना रस्ता करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन दिले होते. तहसीलदार बिडवे यांनी यासाठी प्राधान्याने भेट देऊन दत्त मंदिरापासून या भागाची मंडळ अधिकारी दीपा मुळीक व तलाठी बालाजी गरड यांच्यासमवेत पाहणी केली तसेच याबाबत सर्व कायदेशीर बाबीची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी सरपंच प्रदीपराव सस्ते, डॉ. प्रशांत पवार, सौदागर मोहिते, श्रीहरी मेटे, राजेंद्र भोसले, मनोज पाटील, संतोष डूमणे, आकाश नलावडे,योगेश कुलकर्णी,समाधान कुलकर्णी उपस्थित होते.