प्रतिनिधी / नळदुर्ग
मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा (S.S.C) निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाला असून, यामध्ये नळदुर्ग येथील सय्यद अब्दुल्लाह शाह मेमोरियल उर्दू शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. ५०पैकी २४ विद्यार्थी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत, प्रथम श्रेणीत २१ तर ५ विद्यार्थी द्वितीय श्रेणित उत्तीर्ण झाले आहेत.
शाळेतील विद्यार्थिनी बीबी जैनब इनामदार (९१.६०)प्रथम,खैरुन्निसा कुरेशी (९१.००)द्वितीय,मुनज्जा इनामदार (८९.८०)तृतीय क्रमांक तसेच मनियार जोया (८८.४०), उम्मेहबीबा (८८.२०), सय्यद रफि्योद्दीन (७६.००)यांच्यासह इतर २४ विद्यार्थी, विद्यार्थिनीने विशेष प्रविण्य मिळविले आहे, शाळेचे मुख्याध्यापक फझल शेख, सहशिक्षक इब्राहिम शेख, आयेशा पेरमपल्ली, अमेरा शेख यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गुणवंतांचे अभिनंदन केले आहे.