प्रतिनिधी / धाराशिव
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सहा जणांना श्री. साई परिवार पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. तसेच मान्यवरांच्या हस्ते वाद्यपूजन करण्यात आले.यावेळी परिवारातील सदस्य,गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री साई परिवार पुरस्कार २०२३ व वाद्यपूजन सोहळा २०२३ श्री साई परिवार हा फक्त उत्सव प्रेमी नसून उत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपतो
,असे परिवाराचे प्रमुख रोहित निंबाळकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
यावेळी सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपनिरीक्षक अनघा अंकुश घोडगे
,महिला तक्रार निवारण केंद्र व छेडछाड विरोधी पथकाचे दीपक महादेव लव्हरे
–पाटील
,
पोलीस नाईक नितीन प्रकाश गुंडाळे
, पोलीस हवालदार राईसा शेखलाल
नदाफ, बालकवी समाधान शिकेतोड, बाळासाहेब गोरे
यांना श्री साई परिवार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तसेच श्री साई परिवा
राचे वाद्यपूजन
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या सुविद्य पत्नी अस्मिता
ओंबासे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी डीवायएसपी
मोरे
, ऍड. मिलिंद पाटील, डॉ
.अभय शहापूरकर,
ऍड.राम गरड,
ऍड.शशिकांत निंबाळकर,
ऍड.दिलीप मराठे,दिलीप
हातवळणे दादासाहेब शिंदे, सुहास देशमुख
यांच्यासह श्री साई परिवा
राचे सदस्य
,गणेश भक्त उपस्थित होते.