प्रतिनिधी / इटकळ
तुळजापूर तालुक्यातील इटकळसह परिसरातील काटगाव,शहापुर,निलेगाव,केशेगाव,येवती,आरबळी दिडेंगाव,गावांमध्ये अवैध मटका,दारुविक्री व जुगार,राजरोसपणे सुरू आहे. इटकळ येथे अवैध धंदे पहाटेपासून ते मध्यरात्रीपर्यंत खुलेआम पोलिसांच्या नजरेखाली सुरु आहेत.
अवैध मटका, दारु धंद्यांवर नुकतेच पदभार घेतलेले नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी इटकळ येथे ५ ऑगस्ट रोजी तुळजाई हॉटेलमध्ये अवैधरित्या खुलेआम सुरू असलेल्या दारु विक्रीविरुद्ध कारवाई केली. तसेच हॉटेल भीमाशंकरला लागुन असलेल्या मटका व्यवसायावर धाड टाकुन मटका, चिट्टी,।रोख रक्कम जप्त करून कारवाई केली होती. मात्र या कारवाईला न जुमानता इटकळ येथे पुन्हा एकदा मटका व दारू विक्री सुरू झाली आहे. इटकळ
येथे
मटका बुक्की घेणारे जळकोट येथील दोन व तुळजापूर येथील एक
असून, जळकोट येथील मटका बुक्की चालवणाऱ्याची मुजोरी वाढली आहे
. अनेक वर्षांपासून मटका बुक्कीचा व्यवसाय इटकळ व परिसरात सुरू आहे
. पोलीसां
चाच वरदहस्त असल्यासारखे
हा व्यवसाय परिसरात
सुरू असल्याची चर्चा आहे. नळदुर्ग,इटकळ,अणदूर,काटगाव,शहापुर,निलेगाव,केशेगाव,
येवती परीसराततील
गावातून ३५ ते ४० मटका
एजंट आहेत.मटका
एजंट दुकानात आकडा लिहून कल्याण, मुंबई आकडा पाटीवर लिहून बोर्ड दुकानात लावतात,व दुकानात मटका
खेळणाऱ्यांची गर्दी
वाढत आहे. त्यामुळे अनेक लोकांचे संसार
उध्वस्त झाले
आहेत.