प्रतिनिधी / नळदुर्ग
शहरात महावितरणने वायरमनची नेमणूक करावी या मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने महावितरण शाखा अभियंता नळदुर्ग यांना गुरूवार (दि.१४) रोजी देण्यात आले.
शहरात दोन हजार वीज जोडणी असून शहरातील माऊली नगर,शास्त्री चौक,ब्राम्हण गल्ली,गवळी गल्ली,मराठा गल्ली व भोई गल्ली या परिसरातील महावितरणच्या वायरमनची बदली झाली आहे.यामुळे भागात वीज पुरवठा खंडीत होणे, रिडिंग वेळेवर न घेणे, वीज बील वेळेवर न येणे, बील चुकीचे असणे यासह अनेक अडचणी येत आहेत. तसेच लवकरच गणेशोत्सव सुरू होत आहे. यामुळे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरील ठिकाणी वायरमची नेमणूक करावी अन्यथा आम्हाला लोकशाही पध्दतीने आंदोलन करावे लागेल असे या निवेदनात म्हणले आहे. निवेदनावर भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार यांची स्वाक्षरी आहे.