प्रतिनिधी / मुंबई
मुंबईतील विकास विद्यालयातील कर्ण-बधिर विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या असून, या मुलांच्या उत्साहाने ते भारावून गेले. त्यांनी सांगितले की या मुलांना भेटून खरंच छान वाटलं..त्यांची निरागसता आणि उत्साह शब्दश: कमालच..
राज ठाकरे म्हणाले, मुंबई येथील विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांना मला भेटायचं आहे असं मला सांगण्यात आलं. त्या विद्यार्थ्यांना मी घरीच बोलवून घेतलं. खरंच छान वाटलं. निसर्गाकडून ऐकण्याची क्षमता त्यांना मिळाली नाही, पण त्यांची निरागसता आणि त्यांचा उत्साह शब्दशः कमाल.ते म्हणाले, एका छोट्या मुलीने अगदी हातवारे करून छान कविता म्हणून दाखवली. ह्या सगळ्या मुलांच्या आणि देशातील कर्णबधिर मुलांच्या आयुष्यात कुठल्याच अडचणी नको येऊ देत आणि समाज त्यांना स्वीकारतो आहेच पण त्यांच्या गरजांविषयी आपण सगळेच अधिक सजग होऊया हीच इच्छा.