आरंभ मराठी / उमरगा
धाराशिवचे शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव किरण गायकवाड यांनी उमरगा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदावर दणदणीत विजय मिळवत आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. राजकारणाचा संस्कारक्षम वारसा पुढे नेत किरण गायकवाड यांनी मतदारांचा स्पष्ट विश्वास संपादन केला आहे.
अंतिम मतमोजणीनुसार किरण गायकवाड यांना तब्बल ५९०० मतांची निर्णायक आघाडी मिळाली असून त्यांची अधिकृतरित्या नगराध्यक्ष म्हणून विजयी घोषणा करण्यात आली आहे. या विजयामुळे उमरग्यात गायकवाड घराण्याचे राजकीय वजन पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून स्थानिक राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.









