आरंभ मराठी / तुळजापूर
उद्यापासून सुरू होणाऱ्या ख्रिसमस सणानिमित्त तुळजापूर येथे भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे मंदिर संस्थांनने दर्शन रांगेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ख्रिसमसनिमित्त सलग सुट्ट्या आल्यामुळे राजे शहाजी महाद्वारऐवजी बिडकर पायऱ्यामधून भाविकांना दर्शनासाठी दर्शन मंडपात सोडण्यात येणार आहे.
उद्यापासून ख्रिसमस नाताळच्या व नववर्षाच्या सुट्ट्या सुरु होणार आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरला या सुट्ट्यांमध्ये येत असतात. आठवडाभर होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थांकडून या उपायोजना करण्यात आल्या आहेत.
तसेच उद्यापासून 4 जानेवारीपर्यंत 200 रुपयांचे सामान्य पास व रेफरल पास बंद राहणार आहेत. 500 रुपयांचे पास या कालावधीमध्ये सुरू राहणार असून, पाचशे रुपये पास तसेच सिंहासन व अभिषेक पूजेसाठी जाणाऱ्या भाविकांनाच राजे शहाजी महाद्वार मार्गे मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. याबाबत भाविक, पुजारी, महंत, सेवेकरी यांनी नोंद घ्यावी असे मंदिर संस्थांनमार्फत कळविण्यात आले आहे.









