शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 4 कोटी रुपये निधी मंजूर
कळंब शहरातील रस्त्यांसाठी 6 कोटींचा निधी
आरंभ मराठी / धाराशिव
माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके,अजित पिंगळे यांच्या प्रयत्नामुळे धाराशिव आणि कळंब या दोन शहरातील विकासकामांना 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, धाराशिव आणि कळंब शहरातील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे. यामध्ये धाराशिव शहरासाठी 4 कोटी रुपये तर कळंब शहरातील विकास कामांसाठी 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण विकास कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत धाराशिव आणि कळंब नगरपरिषदांना एकूण 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरविकास विभागामार्फत दिनांक 20 मार्च रोजी यासंबंधीचे शासन शुध्दीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके आणि अजित पिंगळे यांच्या प्रयत्नाने निधी हा निधी मंजूर झाला आहे.
या योजनेअंतर्गत धाराशिव नगरपरिषदेला 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर कळंब नगरपरिषदेला 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून दोन्ही शहरांमधील रस्ते, नाली आणि सभागृहासारखी विविध विकासकामे पूर्ण करण्यात येणार आहेत. धाराशिव शहरात विविध भागात सिमेंट रस्ते बांधणीची 39 कामे होणार आहेत तर सिमेंट नाली बांधणीची 4 कामे होणार आहेत. तसेच शहरातील
प्रभाग क्र. 19 मध्ये सभागृह बांधकाम होणार असून भानू नगरमध्ये ओपन स्पेस विकसित करण्याचे काम या निधीतून होणार आहे. कळंब शहरात देखील 6 कोटींची विकासकामे होणार आहेत. यामध्ये कळंब शहरात दक्षिण हनुमान मंदिरासमोर सभागृह बांधकाम, सावरगाव (पु.) मधील हनुमान मंदिरासमोर लादीकरण, महिला उद्यानात व्यायामाचे साहित्य आणि लहान मुलांसाठी खेळणी बसविणे, पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानांतर्गत विकासकामे, विविध भागांमध्ये लादीकरण, धार्मिक स्थळांच्या परिसरात विकासकामे, तालुका क्रीडा संकुल परिसरात लादीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात लादीकरण, शहरातील धार्मिक मंदिरांसमोर विद्युत पोल उभारणे ही कामे होणार आहेत. 10 कोटींचा निधी उपलब्ध झाल्यामुळे धाराशिव आणि कळंब या दोन्ही शहरातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. येत्या काही दिवसातच या कामांना प्रारंभ होणार आहे.
आता 140 कोटींच्या कामांची प्रतीक्षा –
धाराशिव शहरातील रस्त्यांची दुरवस्था असल्याने नागरिकांत प्रचंड नाराजी आहे. मात्र राजकीय श्रेयवादात आणि कामाच्या वाट्यासाठी कामे सुरू होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः शहरातील डीपी रस्त्यांचा विषय ऐरणीवर आहे. शहरातील 140 कोटींच्या रस्त्यांची कामे मंजुरी स्तरावर आहेत. या कामांना मंजुरी मिळाल्यास शहरातील बहुतांश भागातील रस्ते चकाचक होतील,अशी आशा आहे.
धाराशिव शहरात होणारी विकासकामे :-
1) देशमुख यांचे घर ते निकम यांचे घर (जिजाऊ नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
2) घोळवे यांचे घर ते मुंडे यांचे घर (जिजाऊ नगरं) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
3) घायाळ शिवाजी यांचे घर ते पंढरपुर कर यांचे घर (दत्त नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
4)आहिरे यांचे घर ते भंडारे यांचे घर (दत्त नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
5) कुचेकर घर ते डी. पी घर (उत्तम नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
6) पाटिल यांचे घर ते राऊत यांचे घर सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
7) ओमाशे घर ते दुदभे यांचे घर सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
8) मुनाळे घर वे चौघुले घर (राम नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
9) भोसले मॅडम घर ते राम चंद्र आदमाने (दत्त नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
10) लाईनमन लोहार घर ते रवि किरण शाळा (दत्त नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
11) किशोर मोरे घर ते सोनटक्के घर (दत्त नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
12) दत्त नगर पाटी ते पप्पु जगदाळे घर (दत्त नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
13) मनोज जाधव घर ते अमोल लोहार (गणेश नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
14) होळकर घर ते सचिन देशमुख घर (गणेश नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
15) घाडगे घर ते गणपती मंदिर (तांबरी विभाग) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
16) गणपती घर ते देशमुख घर (तांबरी विभाग) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
17) मोहन पाटील घर ते विष्णु कोळगे घर (जिजाऊ नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
18) घोळवे घर ते सर्यवंशी घर (जिजाऊ नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
19) विजय काकडे घर ते घोळवे घर (जिजाऊ नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
20) माडेकर यांचे घर ते बेदमुथा घर (तेरना कॉलेज) समेंट काँक्रीट रस्ता करणे
21) बोधले घर श्री कासार घर (भानु नगर) समेंट काँक्रीट रस्ता करणे
22) मायभाटे घर ते देशमुख घर (भानु नगर) समेंट काँक्रीट रस्ता करणे
23) ओमाशे घर ते दुदर्भ यांचे घर (जिजाऊ नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
24) सौदागर मन्सुळे घर ते सुर्यवंशी घर (जिजाऊ नगर) सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
25) प्रभाग क्रं १९. राघुची वाडी येथे सभागृह बांधने
26) प्रभाग क्रं १९. जूणी पाटी ते चंद्रगीरी मंदिर सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
27) प्रभाग क्रं १. मध्ये लोखंडे घर ते मुलाणी घर सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
28) प्रभाग क्रं २. राजपुत घर ते देशपांडे घर सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
29) प्रभाग क्रं ३. रोहन निर्फळ घर ते गिरिश अष्टकी घर काँक्रीट रस्ता करणे
30) प्रभाग क्रं ४. धारासुर हाउसिंग सोसायटी बाळासाहेब मुंदडा घर ते देशपांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली करणे
31) प्रभाग क्रं ६. अमोल पाटिल घर ते काकडे घरापर्यंत सिमेंट नाली करणे
32) प्रभाग क्रं ६. दरेकर घर ते बाळासाहेब दंडनाई सिमेंट काँक्रीट रस्ता करणे
33) प्रभाग क्रं ९. कटारे घर ते राउळे घर सिमेंट रस्ता करणे
34) प्रभाग क्रं १०. राम नाकटीळक घर ते बंटी कसबे घर सिमेंट रस्ता करणे व नाली करणे.
35) प्रभाग क्रं ११. झोरेवाडा येथे सिमेंट रस्ता करणे
36) प्रभाग क्रं १६ देवकते प्लॉट ते मोरे घरापर्यंत सिमेंट रस्ता व नाली करणे
37) प्रभाग क्रं १६. पवार घर ते मोरे घरापर्यंत सिमेंट रस्ता करणे
38) प्रभाग क्रं ४. धारासुर हाउसिंग सोसायटी मध्ये वाघ यांचे घर ते वाघमारे घर सिमेंट नाली करणे
39) भानू नगर मध्ये ओपन स्पेस विकसित करणे.
40) सांजेकरी (माळी) घर ते माणे (जिजाऊ नगर) घर सिमेंट काँक्रेट रस्ता.