• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, April 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

धाराशिव बसस्थानकात NCMC कार्ड सेवा पुन्हा सुरू; आरंभ मराठीच्या पाठपुराव्यानंतर प्रवाशांना दिलासा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 7, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
88
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सवलतीच्या प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) स्मार्ट कार्ड काढणे बंधनकारक केल्यानंतर धाराशिव बसस्थानकात गेल्या काही दिवसांपासून मोठी गर्दी होत होती. महिला, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी या सवलतधारक प्रवाशांना कार्ड काढणे आवश्यक असल्याने बसस्थानक परिसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत काही एजंटांकडून प्रवाशांची लूट होत असल्याचे प्रकार समोर आले होते. अधिकृतरित्या १९९ रुपयांत मिळणारे NCMC कार्ड २५० ते ३०० रुपयांपर्यंत विकले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या. धाराशिव जिल्ह्यातील NCMC कार्ड वितरणाचे टेंडर बार्शी येथील एका व्यक्तीला देण्यात आले असून, प्रत्येक तालुक्यात एजंटमार्फत ही सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, केवळ पंधरा दिवसांतच दरांमध्ये मोठी तफावत निर्माण झाली.

धाराशिव बसस्थानकात २५० रुपये, तुळजापूर येथे २५० रुपये, तर कळंब येथे २३० रुपये असे दर आकारले जात होते. काही ठिकाणी खासगी जागेतून कार्ड देताना ३०० रुपयांपर्यंत रक्कम उकळल्याच्या घटना देखील घडल्या. या प्रकाराविरोधात ‘आरंभ मराठी’ने आवाज उठवला होता. दरम्यान, या गैरप्रकारांनंतर मागील चार दिवसांपासून NCMC कार्ड काढण्याची सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.

त्यामुळे कार्ड काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. यासंदर्भात ‘आरंभ मराठी’ने सोमवारी (दि.६) सविस्तर बातमी प्रसिद्ध करताच प्रशासनाकडून तत्काळ दखल घेत आजपासून (दि.७) पुन्हा NCMC कार्ड सेवा सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर कार्डसाठी केवळ २०० रुपयेच शुल्क आकारले जात असल्याचे दिसून आले. सध्या बसस्थानकातील काउंटरबाहेर महिला व ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा मोठी गर्दी झाली असली तरी, सेवा पूर्ववत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘आरंभ मराठी’च्या बातमीमुळे विस्कळीत झालेली सेवा पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #NCMCcard#service#Dharashiv#busstand#passengers#ArambhMarathi
SendShareTweet
Previous Post

लाडकी बहीण योजनेतून जिल्ह्यातील सव्वा लाख महिला बाद, केवायसी करूनही 38 हजार महिलांना हप्ता नाही

Next Post

वडिलांच्या हातून पत्नी-मुलीची निर्घृण हत्या; उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना

Related Posts

वडिलांच्या हातून पत्नी-मुलीची निर्घृण हत्या; उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना

April 7, 2026

लाडकी बहीण योजनेतून जिल्ह्यातील सव्वा लाख महिला बाद, केवायसी करूनही 38 हजार महिलांना हप्ता नाही

April 7, 2026

शक्तिपीठ महामार्गाचे सुधारित रेखांकन जाहीर; धाराशिवमध्ये काय बदल झाला वाचा सविस्तर

April 6, 2026

भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात; प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प

April 6, 2026

धाराशिव बसस्थानकात NCMC कार्डसाठी गोंधळ; सेवा अचानक बंद केल्याने प्रवाशांचे हाल

April 6, 2026

आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडून बळीराजाला दिलासा; ८० लाखांच्या स्वखर्चातून करणार १६० शेतरस्ते

April 6, 2026
Next Post

वडिलांच्या हातून पत्नी-मुलीची निर्घृण हत्या; उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना

ताज्या घडामोडी

वडिलांच्या हातून पत्नी-मुलीची निर्घृण हत्या; उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना

April 7, 2026

धाराशिव बसस्थानकात NCMC कार्ड सेवा पुन्हा सुरू; आरंभ मराठीच्या पाठपुराव्यानंतर प्रवाशांना दिलासा

April 7, 2026

लाडकी बहीण योजनेतून जिल्ह्यातील सव्वा लाख महिला बाद, केवायसी करूनही 38 हजार महिलांना हप्ता नाही

April 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group