• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, April 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 7, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
14
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अनुषंगानें तातडीने पंचनामे करण्यासाठी प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. प्रशासनाने याचे पंचनामे पूर्ण करून प्राथमिक अहवाल शासनाकडे पाठवले आहेत. मात्र, आंब्याच्या मोहोराची मोठी गळ झाल्याने त्याचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची मदत घेऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.

त्याला अनुसरून पंचनामे केले जात आहेत व त्याचप्रमाणें लवकरच ३३% नुकसान झालेल्या इतर फळपिकांचेही स्वतंत्र पंचनामे केले जातील, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. नुकसानीबाबत शेतकऱ्यांना काही अडचणी असल्यास त्यांनी तातडीने संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात झालेल्या गारपिटीनंतर तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पंचनामे करण्याचे काम सुरू देखील झाले आहे व प्राथमिक अहवालही सादर झाले आहेत. मात्र, आंबा पिकाच्या बाबतीत केवळ बाह्य नुकसान न पाहता, मोठ्या प्रमाणात झालेली मोहोराची गळ विचारात घेणे आवश्यक होते.

ही बाब गांभीर्याने घेत छत्रपती संभाजीनगर येथील फळरोपवाटिका संशोधन केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांसह धाराशिव, तुळजापूर, कळंब आणि वाशी या तालुक्यांतील बागांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली आहे. या शास्त्रज्ञांच्या अहवालानुसार आता आंबा पिकाच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

आंब्याप्रमाणेच जिल्ह्यातील इतर फळपिकांचेही गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांना उर्वरित फळबागांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पंचनाम्याची प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान करण्यावर भर दिला जात असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. आज (दि.७) जिल्हा प्रशासनाने सर्व तहसीलदार, कृषी अधिकारी आणि गट विकास अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महत्त्वाची बैठक घेतली.

या बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार तातडीने उर्वरित सर्व पंचनामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे आहेत. उद्यापर्यंत कोणत्याही परिस्थितीत पंचनामे सादर करावेत असे सक्त आदेश प्रशासनाने यंत्रणांना दिले आहेत. यामध्ये गावनिहाय आणि मंडळनिहाय निधीची मागणी स्पष्टपणे नोंदवण्याबाबतही आदेशित करण्यात आले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #mango#Panchnama#Information#MLA#RanajgajitsinhPatil
SendShareTweet
Previous Post

वडिलांच्या हातून पत्नी-मुलीची निर्घृण हत्या; उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना

Next Post

ट्रेडिंगच्या आमिषाने डॉक्टरची 63.50 लाखांची सायबर फसवणूक; गुन्हा दाखल

Related Posts

ट्रेडिंगच्या आमिषाने डॉक्टरची 63.50 लाखांची सायबर फसवणूक; गुन्हा दाखल

April 7, 2026

वडिलांच्या हातून पत्नी-मुलीची निर्घृण हत्या; उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना

April 7, 2026

धाराशिव बसस्थानकात NCMC कार्ड सेवा पुन्हा सुरू; आरंभ मराठीच्या पाठपुराव्यानंतर प्रवाशांना दिलासा

April 7, 2026

लाडकी बहीण योजनेतून जिल्ह्यातील सव्वा लाख महिला बाद, केवायसी करूनही 38 हजार महिलांना हप्ता नाही

April 7, 2026

शक्तिपीठ महामार्गाचे सुधारित रेखांकन जाहीर; धाराशिवमध्ये काय बदल झाला वाचा सविस्तर

April 6, 2026

भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात; प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प

April 6, 2026
Next Post

ट्रेडिंगच्या आमिषाने डॉक्टरची 63.50 लाखांची सायबर फसवणूक; गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी

ट्रेडिंगच्या आमिषाने डॉक्टरची 63.50 लाखांची सायबर फसवणूक; गुन्हा दाखल

April 7, 2026

आंबा फळबागांप्रमाणे उर्वरित फळबागांचेही पंचनामे तातडीने होणार

April 7, 2026

वडिलांच्या हातून पत्नी-मुलीची निर्घृण हत्या; उमरगा तालुक्यातील धक्कादायक घटना

April 7, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group