• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, February 21, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांकडेच राहणार; राज्य शासनाची अधिसूचना जारी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 21, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
3
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यातील तब्बल ४२८ ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपुष्टात आली असून या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, या प्रक्रियेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे प्रशासनासमोर दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.

दरम्यान, प्रशासकीय अडचणींमुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेत घेणे शक्य झाले नसल्याने राज्य शासनाने या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ अंतर्गत यासंदर्भातील अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १५१ च्या उप-कलम (१) मधील खंड (अ) च्या दुसऱ्या परंतुकानुसार, जर प्रशासकीय कारणांमुळे पंचायत निवडणुका घेणे शक्य नसतील, तर शासनास संबंधित ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा अधिकार आहे.

तसेच अधिनियमाच्या कलम १८२(१) अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून राज्य शासनाने संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयानुसार, संबंधित मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचांचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.

ही नियुक्ती सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल त्या कालावधीपर्यंत लागू राहणार आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायतींच्या दैनंदिन प्रशासनात सातत्य राहणार असून विकासकामे, शासकीय योजना अंमलबजावणी, नागरी सुविधा तसेच स्थानिक प्रशासनाशी संबंधित कामे पूर्वीप्रमाणेच सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होणार आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#Expired#GramPanchayats#Sarpanches#State#Notification#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

धक्कादायक! सावत्र मुलाकडूनच आईवर लैंगीक अत्याचार; साथीदारासह मारहाण

Related Posts

धक्कादायक! सावत्र मुलाकडूनच आईवर लैंगीक अत्याचार; साथीदारासह मारहाण

February 21, 2026

काम न करता सात लाखांचा अपहार; बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

February 19, 2026

लोहटा पश्चिम शिवारात गुप्त अफू शेतीचा पर्दाफाश; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

February 18, 2026

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजणार;  २० फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेला प्रारंभ

February 18, 2026

धाराशिव जिल्ह्यात पुन्हा ‘गूढ आवाज’; सकाळी ८.०३ वाजता धरणी कंप झाल्याची चर्चा

February 18, 2026

राजकारणाला कलाटणी, बहुमताचा आकडा गाठला; आता सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे ‘हा’ नवीन पर्याय..

February 17, 2026

ताज्या घडामोडी

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांकडेच राहणार; राज्य शासनाची अधिसूचना जारी

February 21, 2026

धक्कादायक! सावत्र मुलाकडूनच आईवर लैंगीक अत्याचार; साथीदारासह मारहाण

February 21, 2026

काम न करता सात लाखांचा अपहार; बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

February 19, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group