अखेरच्या दिवशी 308 अर्ज; नगरसेवकांसाठी तब्बल इतके उमेदवार रिंगणात
आरंभ / धाराशिव
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीसाठी सोमवारी अंतिम दिवशी उमेदवारी अर्जांचा अक्षरशः महापूर उसळला. दिवसभर नगरपालिका कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी, ढोल-ताशे आणि समर्थकांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. अखेरच्या दिवशीच नगरसेवक पदासाठी तब्बल 293 आणि नगराध्यक्ष पदासाठी 15 अर्ज दाखल झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले.
अंतिम आकडेवारीनुसार नगराध्यक्ष पदासाठी एकूण 34 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वाधिक 14 अर्ज भाजपकडून, तर 4 अर्ज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून दाखल झाले. शिवसेना (शिंदे), एमआयएम, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे.
तसेच 8 अपक्ष उमेदवारांनीही नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरून मुकाबला चुरशीचा केला आहे. नगरसेवक पदासाठी एकूण 568 उमेदवारी अर्ज जमा झाले असून, यात सर्वाधिक 117 – भारतीय जनता पक्ष, 94 – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर इतर प्रमुख पक्षांकडून प्रत्येकी 50 च्या आसपास अर्ज दाखल झाले. यासोबतच 163 अपक्ष उमेदवार मैदानात उतरले आहेत.
अपक्ष उमेदवारांची प्रचंड संख्या हेही या निवडणुकीचे मोठे आकर्षण ठरत आहे. रविवारपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 19 आणि नगरसेवक पदासाठी 275 अर्ज दाखल झाले होते. मात्र सोमवारी अंतिम दिवस असल्याने राजकीय पक्षांनी प्रचंड उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरपालिका कार्यालय परिसरात समर्थकांची झुंबड उडाली उडाली.
नगराध्यक्ष पदासाठी पक्षनिहाय उमेदवारांची यादी
भाजप
चौरे सुवर्णा खंडेराव
लाटे छाया पांडुरंग
नळे वर्षा युवराज
सलगर शर्मिला संभाजी
भोई ज्योती पापालाल
धत्तूरे मीनाक्षी संभाजी
यादव ज्योती अजयकुमार
परदेशी शिवानी राजेश
ढोबळे पूर्वा अक्षय
मंजुळे रुक्मिणी पिराजी
काकडे नेहा राहुल
अडसूळ राजकन्या पोपट
मुंडे अश्विनी चंद्रकांत
शिवसेना (उबाठा) –
काकडे वर्षा श्रीमंत
गुरव संगीता सोमनाथ
गुरव वर्षा चंद्रकांत
शिवसेना (शिंदे)
कविता सुरज साळुंखे
मुंडे अश्विनी चंद्रकांत
राष्ट्रवादी (शरद पवार गट)
कुरेशी परवीन खलील
राष्ट्रवादी (अजित पवार गट)
मंजुषा विशाल साखरे
काँग्रेस – राऊत राधिका धनंजय
एमआयएम –
पठाण हाजीराबी मैनुद्दीन
मोमीन नाझिया इसुफ
वंचित बहुजन आघाडी
वाघमारे सुरेखा नामदेव
अपक्ष –
पठाण हाजीराबी मईनुद्दीन
कुरेशी परविन खलील
हन्नुरे हिना हाजी
राऊत राधिका धनंजय
मुंडे अश्विनी चंद्रकांत
यादव ज्योती अजय कुमार
पवार कल्पना भारत
नळे वर्षा युवराज
इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या अर्जांमुळे प्रत्येक प्रभागात चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठीच्या 34 उमेदवारांमुळे धाराशिवमध्ये राजकीय लढाई अधिक रोचक होणार आहे. आज उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून यातील किती अर्ज बाद होतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अपक्ष म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर काही उमेदवारांनी दोन किंवा तीन पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अर्जांची संख्या वाढली आहे.









