सर्वसाधारण गटासाठी 31, ओबीसीसाठी 14, एससीसाठी 9, तर एसटीसाठी 1 जागा निश्चित
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीत एकूण ५५ जागांपैकी सर्वसाधारण गटासाठी ३१, इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) १४, अनुसूचित जातीसाठी (एससी) ९, तर अनुसूचित जमातीसाठी (एसटी) १ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
यामध्ये एसटी प्रवर्गासाठी एकमेव जागा ढोकी गटासाठी सुटली आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने ही आरक्षण सोडत पार पडली.
आरक्षणानुसार आता प्रत्येक गटातील राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे. काही प्रभाग सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने नव्या उमेदवारांना संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या या सोडतीनंतर राजकीय पक्षांनी पुढील निवडणुकीच्या रणनीतीवर विचारविनिमय सुरू केला आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर काही गटातील बदलांमुळे कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेला सुटले असल्यामुळे अगोदरच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चुरस वाढली आहे. त्यातच गटाचे आरक्षण सुटल्यानंतर दिवाळीत खऱ्या अर्थाने राजकीय वातावरण तापणार आहे.
अशी आहे आरक्षण सोडत
अनुसूचित जातीसाठी राखीव गट – (९) – (महिला-५)
सिंदफळ (महिला), वडगांव सि (महिला), डिकसळ (महिला), सांजा, येरमाळा (येरमाळा), काक्रबा, खामसवाडी, सास्तुर (महिला) शहापूर
अनुसूचित जमातीसाठी राखीव – (१)
ढोकी
ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागा – १४ – (महिला-७)
वालवड (महिला), शिराढोण, उपळा (मा.), पळसप, येडशी, काटी (महिला), काटगाव, लोणी (महिला), येणेगुर (महिला), मोहा (महिला), मंगरूळ, पाथरूड, तुरोरी (महिला), सुकटा (महिला).
सर्वसाधारण गटासाठी राखीव – ३१ – (महिला – १६)
ईट (महिला), आष्टा, पारगांव (महिला), पारा (महिला), तेरखेडा, ईटकुर, मंगरुळ (महिला), नायगांव, कोंड (महिला), तेर (तेर) अंबेजवळगा (महिला), पाडोळी, केशेगांव (महिला), बेंबळी, शेळगाव, आनाळा (महिला), जवळा (नि), डोंजा, जळकोट (महिला), अणदूर, नंदगाव, कानेगाव (महिला), माकणी (महिला), जेवळी (महिला), कवठा, बलसूर (महिला), कुन्हाळी (महिला), गुंजोटी, दाळिंब, आलूर, कदेर (महिला).