आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेच्या
नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या मतमोजणीत एकूण १०,५३१ मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. या मतमोजणीत भाजपच्या उमेदवार नेहा राहुल काकडे यांनी सर्वाधिक मते मिळवत आघाडी घेतली आहे.
भाजपच्या नेहा राहुल काकडे यांना ४,०३५ मते मिळाली असून त्या पहिल्या क्रमांकावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) यांच्या उमेदवार कुरेशी परविन खलील यांना ३,२१३ मते मिळाली असून त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शिवसेना (उबाठा) यांच्या उमेदवार गुरव संगीता सोमनाथ यांना २,६४१ मते मिळाली आहेत. सध्याच्या स्थितीत भाजपच्या नेहा राहुल काकडे या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) यांच्या उमेदवार कुरेशी परविन खलील यांच्यावर ८२२ मतांची आघाडी घेत आघाडीवर आहेत.









