आरंभ मराठी / धाराशिव
वडील रामपाल महाराजांची भक्ती करतात म्हणून मुलाने बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना धाराशिव तालुक्यातील पळसप गावात घडली.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, पळसप येथील आरोपी वैभव चद्रकांत लाकाळ याने दिनांक 31 जुलै रोजी रात्री पावणे अकरा वाजता त्यांचे वडील चंद्रकांत मदन लाकाळ (वय 65 वर्षे) यांना रामपाल महाराज यांची भक्ती करुन नको म्हणून खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले.
दुर्दैवाने या मारहाणीत चंद्रकांत लाकाळ यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
याप्रकरणी प्रमोद चंद्रकांत लाकाळ यांनी दिनांक 9 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे ढोकी येथे भा.न्या.सं.कलम 103(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.